HW News Marathi
देश / विदेश

… म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन केला जातो साजरा

मुंबई | देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये जय्यत तयारी देखील सुरू आहे. यंदा आपण सर्वजण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेड काढली जाते. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आण नौदलच्या विविध रेजिमेंट्स सहभागी होतात. तसेच या परेडमध्ये देशातील विविध राज्यांचे चित्ररथ संचलनात सहभागी होतात. या परेडमधील चित्ररथ हे त्या त्या राज्यातील वैशिष्ट्ये किंवा खास वैशिष्ट्ये असल्याचे चित्ररथ संचलन राजपथावर होते. परंतु, आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला का साजरा केला जातो. त्यामागचे महत्वाचे कारण नेमके काय आहे. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ या…

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते. यामुळे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून देशभरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. तसेच 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले होते. यामागचे कारण होते की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. यामुळे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी रोजी  भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

भारत असा बनला प्रजासत्ताक राष्ट्र 

26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एका बग्गीतून राष्ट्रपती भवनातून बाहेर आले होते. प्रथमच राष्ट्रपतींना प्रथमच लष्करी सलामी दिली. यानंतर प्रथमच गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एस. ए. बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींची मंजुरी

News Desk

#AyodhyaRamMandir : माझ्या हृदयाजवळचं एक स्वप्न पूर्ण होतंय !

News Desk

अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिंद्धू यांचे कार अपघातात मृत्यू

Aprna