Site icon HW News Marathi

“पप्पू कभी पास नहीं होगा”, नितेश राणेंचा राहुल गांधींना टोला

मुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत जे कलाकार दिसून येत आहे. त्या कलाकारांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देण्यात आले आहेत, असा आरोप भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून एका व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये नितेश राणेंनी “सब गोलमाल है भाई! ये पप्पू कभी पास नहीं होगा”, असे म्हणत राहुल गांधींना टोला लगावला आहे. सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर  राहुल गांधी हे तीन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहे.

 

ट्विटमध्ये राणे म्हणाले, “राहुल गांधींचे यात्रेचे स्टेज मॅनेज केले जाते. त्यांच्यासोबत येण्यासाठी आणि फिरण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात याचा हा पुरावा आहे. सब गोलमाल है भाई! ये पप्पू कभी पास नहीं होगा” , असे लिहत त्यांनी एका व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉटमध्ये, “राहुल गांधींच्या यात्रा मध्य प्रदेशमध्ये येणार आहे. दरम्यान, आम्ही विनंती करतो की, मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसोबत पंधरा मिनिटं चालण्यासाठी कलाकारांनी सहभागी व्हावे. या यात्रेत सहभागी पंधरा मिनिटे चालण्यासाठी तुमचे मानधन किती असेल? याची माहिती आम्हाला द्यावी, अशा गोष्टी या व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉटमध्ये नमूद केले आहे.

 

काय म्हणाले नितेश राणे?

यासंदर्भात राणेंनी व्हिडिओद्वारे देखील भारत जोडो यात्रेवर टीका करत पैसे घेऊन कलाकारांना बोलावण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. राणे म्हणले, ” राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये जे दिसणारे कलाकार आहेत. त्यांना पैसे देऊन आणलाय अशा एका एजन्सीला पाठवलेल्या व्हॉट्सअप मेसेजच्या स्क्रीनशॉटवरून सिध्द होते. मध्य प्रदेशमध्ये कुठला कलाकार राहुल गांधींच्या सोबत पंधरा मिनिटे चालू शकतो. यासाठी इतके-इतके पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, असा संदेश भारत जोडो यात्रेच्या टीमकडून काही एजेंसीना पाठवलेला आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हे जी काही नौटंकी सुरु आहे आणि जे कलाकार येऊन यात्रेत सहभागी होतात आणि पंधरा पंधरा मिनिटे राहुल गांधींसोबत चालतात आणि राहुल गांधींना पाठिंबा देतायत ते पैसे देऊन आणले आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे”, असा सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले.

 

 

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले कलाकारांची नावे 

अभिनेत्री रिया सेन
अभिनेत्री पूजा भट्ट
अभिनेत्री स्वर भास्कर
अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल पालेकर
अभिनेता सुशांत सिंग

Exit mobile version