HW News Marathi
महाराष्ट्र

समीर वानखेडेंची जात पडताळणी नक्की कोणत्या जिल्ह्यात ? माहिती अधिकारातून उघड

बारामती | मुंबईच्या अम्ली पदार्थ विरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची जात पडताळणी मुंबई, वाशिम व अकोला जात पडताळणी समिती कार्यालयात झाली नसल्याची माहिती बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना मिळाली आहे. बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व वानखेडे मोठा वादविवाद झाला होता. मलिक यांनी तर वानखेडे यांच्या जात व धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समीर ज्ञानदेव वानखेडे यांचे खरे नाव समोर दाऊद वानखेडे असल्याचे पुरावे दाखल करत मोठा गौफ्यस्फोट केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तंबी दिल्याने हे वाक युद्ध थांबले होते.

दरम्यान, बारामती तालुक्यातील करंजे पुल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडे माहिती अधिकारात समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावाने जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित झाल्याबाबत माहिती मागितली होती. यावर सदर कार्यालयाने माहिती अधिकार अर्ज मुंबई शहर, जिल्हा,तसेच वाशिम व अकोला जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे अर्ज वर्ग केला असता समीर ज्ञानदेव वानखेडे नावाने या तिन्ही जिल्ह्यात जात पडताळणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांची जात पडताळणी नक्की कोणत्या जिल्हा जात पडताळणी समिती कडे झाली आहे असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा!

News Desk

‘आमदार आहात. किमान नागरिकशास्त्र वाचा’, यशवंत जाधवांचा आशिष शेलारांना टोला

News Desk