HW News Marathi
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षाची निवड होणार?

मुंबई | राज्याच्या विधीमंडळाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. महाविकासआघाडी सरकार अध्यक्ष अधिवेशनात आज (२८ डिसेंबर) विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचे लगून राहिले आहे. यामुळे आता ठाकरे सरकारने राज्यपालांना खरमरीत पत्र पाठवून अध्यक्षपदाची निवड आजच करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवड आवाजी मतदानने होण्याची निवडणूक करण्याची प्रक्रिया ही घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांना सरकारने पाठविलेल्या पत्राला त्यांनी काल (२७ डिसेंबर) उत्तर दिले आहे.  यासंदर्भात राज्यपालांनी महाविकासआघाडी सरकारला पाठविलेल्या पत्र म्हटले आहे. यामुळे आता महाविकासाघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाल्या आहेत. यापूर्व मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले होते. याआधी महाविकासआघाडी सरकार तीन वेळा राज्यपालांना पत्र पाठविले होते. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर महाविकासआघाडीमधील तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी (२६ डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या कार्यक्रम राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. महाविकासआघाडी सरकारने अध्यक्षाच्या निवडीच्या कार्यक्रमात केलेल्या बदलाबाबत राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेण्यास सांगितले होते.

राज्यपालांनी अध्यक्ष पदाच्या निवडी प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले, मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, विधीमंडळामधील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही. तसेच अध्यक्ष पदाच्या नियमातील बदल हे कायदेशीर आहे की नाही, हे तपासण्यासाठी जास्त वेळ घेऊ नये. राज्यपालांनी सायंकाळपर्यंत उत्तर द्या. नाही तर तुमची अनुमती आम्ही गृहीत धरणार नाही, असे स्पष्टपणे पत्रात म्हटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

News Desk

चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

News Desk