HW Marathi
व्हिडीओ

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

“चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत जे बोलले ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेले उत्तर होते. मात्र, आम्ही पुढील निवडणुका स्वबळावरच लढणार आहोत. त्यामुळे, आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, शिवसेनेकडूनही आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही”, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे “राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. मात्र, आम्ही एकत्र यायची जरी वेळ आली, तरीही आम्ही यापुढे निवडणुका मात्र एकत्र लढणार नाही”, असे अत्यंत मोठे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२८ जुलै). मात्र, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबाबत केलेले हे विधान आता देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे खोडून काढले आहे.
Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray, Chandrakant Patil, BJP, Shivsena, MahaVikasAaghadi   

Related posts

आम्ही आहोत Pad woman

News Desk

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

Gauri Tilekar

दख्खनच्या राणीचा ८८ वा वाढदिवस जल्लोषात साजरा

मानसी जाधव