HW News Marathi
व्हिडीओ

Aashish Shelar On Mahashivaaghadi | सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजपचं लक्ष..

भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. शेलार म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि इतर पक्षातील सुरू असलेल्या चर्चेवर आमचं लक्ष आहे, असेही शेलार म्हणाले. शेलार म्हणाले की, राज्यभरात 90 हजार बुथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधानपरिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.#BJP #Aashishshelar #SharadPawar #UddhavThackeray #SoniaGandhi #Congress #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार

Seema Adhe

मुंबईमध्ये शिवसेना- भाजपमध्ये हाणामारी ! शिवसेना भवनासमोरचं राडा…

News Desk

Prakash Aambedkar | विधानसभेला वंचित आघाडी गॅसवर..!

Arati More