HW News Marathi
व्हिडीओ

अमित शाहांचा शिवसेनेला छुपा संदेश ? भाजप-सेना एकत्र येण्याचे पुन्हा संकेत ?

शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून महाराष्टात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. आणि यानंतर आता तब्बल दीड वर्षांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला. काल सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमित शाह बोलत होते. यावेळी “बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असे अत्यंत टीका अमित शहा यांनी शिवसेनेवर केली. तर दुसरीकडे सत्तास्थापनेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या मतभेदांवर अमित शहांनी थेट भाष्य करून एक स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे. तो असा कि, अमित शाह हे फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि येत्या काळात महाराष्ट्राचे राजकारण बदलणारा ठरला, तर आश्चर्य वाटू नये. कारण, भाजप आणि शिवसेनेत आताच्या घडीला संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेलेले असले तरीही हे दोन्ही पक्ष येत्या काळात कधीही एकत्र दिसणार नाहीत असे म्हणणं घाईचं ठरले. त्यामागे काही तशीच कारणं आहेत. ती कोणती ? पाहूया

#UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #AmitShah #Shivsena #BJP #NCP #MahaVikasAaghadi #MahaYuti #Maharashtra #MahaPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मला शिंदे समर्थक आमदारांचा कॉल आला” – Devendra Bhuyar

News Desk

Baramati Band -Sharad Pawar | आमच्या दैवताला काही झालं तर आत्मदहन करू….

Arati More

Mandeshi Festival ।मुंबईत अनुभवा माणदेशी झलक

News Desk