HW News Marathi
व्हिडीओ

“…मग तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”; Chitra Wagh भडकल्या

काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने उत्तर कोल्हापूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. कोल्हापूरमध्ये एकही आमदार नाही ही खंत भाजपला असल्याने चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस पक्षाकडून मतदार संघ कोल्हापूर मतदारसंघात पोटनिवडणूक वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे.एका भाषणात सतेज पाटील यांनी नाशिकच्या वाघांच्या अनेक भानगडी आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून चित्रा वाघ यांनी सतेज पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. निवडणूक आहे विकासावर बोला. माझ्या नवऱ्याची एकही भानगड काढून दाखवा. मी तुमच्या भानगडीचे व्हॉल्युम काढून दाखवेन, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?. तुमची सत्तेची मग्रुरी गुंडांवरती दाखवा, बलात्काऱ्यांवर दाखवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

#ChitraWagh #NanaPatole #SatejPatil #BJP #Congress #ChandrakantJadhav #Kolhapur #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘या’ नेत्याचा महाविकासआघाडीला घरचा आहेर!

News Desk

“सुरक्षा सोडून जायला तयार..”; Sanjay Raut यांचं चॅलेंज Narayan Rane यांनी स्वीकारलं!

News Desk

MLA Ravi Rana यांना रॅली दरम्यान आली भोवळ; ताबडतोब नेले रुग्णालयात

News Desk