HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil Vs Sharad Pawar | पवारांना सांगा, स्वप्न पाहू नका.. सरकार आमचचं येणार !

महिनाभरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीतही सत्ता भाजपकडेच राहिल, असा दावा केला आहे. सरकार भाजपचंच येणार आहे हे शरद पवारांना सांगा. ते अजूनही विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत आहेत, असाही टोला पाटील यांनी पवारांना लगावला. ते बारामतीत भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना बोलत होते.चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभेतील पराभवाने नाउमेद न होता 2024 ची निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य ठेवण्याचं आवाहन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांनाही आपलं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिला. त्यानंतर हे पवारांनाही सांगा. पवारांना आजही विधानसभेत सत्ता येईल असंच वाटत आहे, असा टोला पवारांना लगावला.#ChandrakantPatil #SharadPawar #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MahavikasaAaghadi Vs BJP | महाविकासआघाडी भाजपच्या या 4  दिग्गजांवर कारवाई करणार ?

Arati More

उत्कृष्ट रुग्णालयाच्या यादीत केईएमची नोंद

News Desk

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk