HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

शरद पवारचं संजय राठोडला हटवतील! भाजप शरद पवारांना भेटणार…

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार बरसल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.“मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे.” असे चित्रा वाघ यांनी सांगितले. दरम्यान, चित्रा वाघ यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे.

#sharadpawar #chitrawagh #sanjayrathod #bjp #ncp #uddhavthackeray #poojachavan

Related posts

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

Arati More

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चीनची चाल ? वृत्तानंतर अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Dhananjay Munde | हा जनसमुदायच माझ्या विजयाची खात्री देतो !

Gauri Tilekar