HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेची वाटचाल UPA कडे! Sanjay Raut पुन्हा ठरणार गेमचेंजर?

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही वेगवेगळ्या विचारधारांचे तीन पक्ष एकत्र आले. तेव्हापासून आपण पाहतोय कि राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अधिक जवळीक दिसते. तर अनेक मुद्द्यांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्येही थेट वाद पाहायला मिळतात. सर्वत्र काँग्रेस स्वबळाचा नारा देऊन कुठेतरी आपलं वेगळं स्थान दाखवून देण्याच्या प्रयत्नात असते. सुरुवातील डावललं जात असल्याची भावना आणि त्यानंतर ह्याच भावनेतून स्वतःच वेगळं अस्तित्त्व स्थापन करण्याचा काँग्रेसचा राज्यातला हा प्रयत्न दिसला आहे. दरम्यान, एकीकडे राज्यात हे असं काहीसं चित्र असलं तरीही केंद्रात मात्र शिवसेना हि काँग्रेसला भक्कम साथ देण्याच्या आणि पर्यायाने स्वतःचंहि स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसते आहे.ते कसं तर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्यातली जवळीक वाढत चालल्याचे म्हटलं जात आहे. दिल्लीत लवकरच हा गाठीभेटींचा सिलसिला देखील सुरु होणार आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया

#SanjayRaut #RahulGandhi #PriyankaGandhi #Shivsena #Congress #MVA #UPA #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“BJP नेते तोंड लपवून पळतील” असा कोणता खुलासा Nawab Malik करतील ?

News Desk

Dahi Handi 2019 | गोविंदा पथकांचा राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

swarit

मेट्रो कारशेडचे काम थांबवा ! मोदी सरकारचा दणका, ठाकरे सरकारही आक्रमक

News Desk