HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई महापालिकेची तयारी,नितेश राणे ठरले ‘कारभारी’!

भाजपनं येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीवर भाजपचा झेंडा लावण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.. मुंबई महापालिका काबीज करण्याच्या उद्देशाने एकूणचं निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली. मुंबईत राहणाऱ्या मतदारांमधील प्रत्येक घटकाला आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती आखलीय. त्याचाच भाग म्हणून कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याचं बोललं गेलं. आता त्याला दुजोरा देणारा निर्णय घेत भाजपनं नितेश राणे यांना दक्षिण मध्य मुंबईची धुरा सोपवण्यात आली आहे..मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबई प्रदेशने गठीत केलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुक कोअर कमिटीवर आमदार नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. या कमिटीची मुंबईत बैठक झाली. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागली. आणि आता भाजपने नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने ही रणनिती आखली आहे. नितेश राणे शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर आणि सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्या याच आक्रमक शैलीचा भाजपाला फायदा होणार असल्याचं दिसून येत आहे.

#niteshrane #chandrakantpatil #devendrafadnavis #mumbai #bmc #shivsena #pravindarekar #uddhavthackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje-AdityaThackeray-Sanjay Raut | उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद ,राऊत-आव्हाडांच्या निषेध

Arati More

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीकडून ‘हे’ आश्वासन ! शिवसेनेमुळे अडचण होणार ?

News Desk

उरल्यासुरल्या पक्षाला “पेंग्विन सेना” म्हणायचं का? Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल

Seema Adhe