भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे पाकिस्तानला चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे. मंगळवारी भारतीय वायु सेनेच्या ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बावचळलाय. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करताय. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्यूत्तर दिले