HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरे म्हणतात, खडसेंच्या ‘त्या’ सीडीची वाट बघतोय!

भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे म्हटले होते. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

#RajThackeray #EknathKhadse #SharadPawar #ED #bjp #mns #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्लीनचिट’चा प्रश्नच नाही! ‘जलयुक्त शिवार’वरून ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

News Desk

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी Raj Thackeray यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र!

News Desk

शुद्धीकरणानंतर Narayan Rane,Devendra Fadanvis सह BJP नेत्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल…

News Desk