HW Marathi
व्हिडीओ

“घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?”, दानवेंची बोचरी टोलेबाजी

परतीच्या पावसाने राज्यातील खासकरुन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दानवे आज (१७ ऑक्टोबर) पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
#RaosahebDanve #UddhavThackeray #COVID19 #Maharashtra #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #MahaVikasAghadi

Related posts

मला धमकी देता? माझी चौकशी करा! फडणवीसांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज…

News Desk

विनोदापासून ते विनोदपर्यंतचा प्रवास…. | दादा कोंडके

Adil

Milind Anna Kamble NCP | मी निवडून आल्यावर कामे होणारच, लोकांना विश्वास !