HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Nirupam | आता संजय निरुपम शिवसेनेच्या वाटेवर ?

काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनीही पक्षाला रामराम करत असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मी पक्षाच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सहभाही होणार नाही, असे ट्विट निरुपम यांनी केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. या तिन्ही यादीपर्यंत संजय निरुपम यांनी मुंबईतील एका जागेसाठी हट्ट धरला होता. मात्र, पक्षाकडून त्यांच्या शब्दाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या संजय निरुपम यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये कुठलाही प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षाच्या प्रचार अभियानातही मी सहभागी होणार नसल्याचे निरुपम यांनी सांगितले. निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे.#SanjayNirupam #Congress #Shivsena #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशिया खंडांतील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत भाजपने जिंकली! मोहिते-पाटलांची जादू कायम…

News Desk

Raosaheb Danve Exclusive | काही केलं नाही,तर घाबरता कशाला ? रावसाहेब दानवे Exclusive

Arati More

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक…

News Desk