HW Marathi
व्हिडीओ

ऑनलाईन नव्हे, यंदाचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार ! संजय राऊतांचं स्पष्टीकरण

करोना संकट अद्यापही पूर्पणणे टळलं नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीप्रमाणे साजरा करणार की यावेळी उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधतील अशी चर्चा सुरु आहे. ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं होतं. पण आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार असल्याचं म्हटलं आहे.“उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल,” असं सांगताना संजय राऊत यांनी याबद्दल सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. “शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल असं कोणी सांगितलं?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #Dussehra #Mumbai #Shivsena #Maharashtra

Related posts

Devendra Fadnavis BJP | …तर देवेंद्र फडणवीस स्वतःच विरोधी पक्षनेते बनतील !

Gauri Tilekar

Sharad Pawar – Baramati Shut | ‘बारामती बंद’ सरकारच्या विरोधात,पवारांच्या समर्थनार्थ…

Arati More

‘मी ईडी चौकशीला जाईन पण …’ अनिल देशमुखांचे २ मोठे खुलासे !

News Desk