HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय ?

पुण्यात पंकजा मुंडे,धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यात ऊसतोड कामगारांच्या मुद्दयांवर बैठक झाली.उसतोड कामगारांसाठी समाधानकारक निर्णय झाला का? हा विषय चर्चेत आलाच नाही कारण मुंडे बहीण-भावाच्या मनोमिलनाची अधिक चर्चा झाली.पवारांनी मुंडे बहिण-भावाची दिलजमाई करण्यासाठी हा घाट घातला का असा प्रश्न समोर येतोचं! मात्र एकीकडे मुंडे बहिण-भाऊ चर्चेत असताना पंकजा मुडेंचा पवारांना नमस्कार घालतानाचा फोटो समोर आला आण चर्चा सुरू झाली पंकजा राष्ट्रवादीत जाणार का ? याची.त्यातचं पंकजांनी खुल्या मनाने पवारांच्या स्पिरीटच कौतुक केलं आणि राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी खडसेंनंतर पंकजा ताई राष्ट्रवादीत येणार अशा पोस्टी फिरवायला सुरूवात केली.पुण्यातल्या बैठकीत शरद पवारांनी पंकजांना राजकीय सल्ला दिला असेल का,यावरही सध्या तर्कवितर्क लगावले जातायतं. पण पंकजांच्या पक्षातरांची शक्यता सध्या तरी दिसत नाही आणि पक्षांतर झालचं तर ते शिवसेनेत होईल असं एकंदरीत वातावरण आहे. पंकजांच्या पक्षांतरांची चर्चा होतेय म्हणुन गोपिनाथ मुंडेच्या भाजपविषयीच्या नाराजीचा किस्सा तुम्हांला सांगावा वाटला.

#PankajaMunde #GopinathMunde #SharadPawar #BJP #NCP #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार”- Bacchu Kadu

News Desk

“भोंगे काढावे असं कुठेही म्हटलेलं नाही”; Dilip Walse Patil यांचं मोठं विधान

News Desk

खडसेंना आमदारकी मिळणार का ? राज्यपाल महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचा ‘हा’पॅटर्न राबवणार?

News Desk