HW News Marathi
राजकारण

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

बारामती | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्यांना फटकारल्यानंतर पार्थ पवार आता काय निर्णय घेणार ? त्याचप्रमाणे अजित पवार यांची भूमिका काय असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू होती. या प्रकारामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेला तणाव मिटवण्यासाठी बारामतीत एकत्र मिळून चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. याच पार्श्वभूमीवर काल (१५ ऑगस्ट) पार्थ पवार बारामतीत दाखल झाले असून आज (१६ ऑगस्ट) अजित पवारही बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इतकेच नव्हे तर शरद पवार देखील आज बारामतीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार हे आपल्या बारामती दौऱ्यात विविध विकासकामांची करणार पाहणी करणार आहेत. तसेच, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठक घेतील आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ देतील. मात्र त्याचवेळी अजित पवार कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाबाबतही घरातील सर्व सदस्यांची चर्चा करतील, अशी माहिती आहे. त्याचप्रमाणे, यावेळी शरद पवारही उपस्थित असतील. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान पवार कुटुंबात निर्माण झालेला हा वाद मिटणार का ? त्याचप्रमाणे अजित पवार आता तरी मौन सोडणार का ? शरद पवारांची भूमिका काय असणार ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शक्यता आहे.

Related posts

“शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार,” उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

अपर्णा

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

News Desk

बदनामीकारक वक्तव्य केल्याने अण्णा हजारेंची नवाब मलिक यांना नोटीस

News Desk