HW News Marathi
राजकारण

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहात, फेसबुकसारख्या माध्यमाचा दळभद्री वापर सुरू असेल तर….

मुंबई | अमेरिकेतील वाॅल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राच्या बातमीचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. फेसबुक व व्हाॅट्सअप या समाजमाध्यमावर भाजपचे नियंत्रण आहे, या राहुल गांधींच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात चांगलाच वाद पेटला. शिवसेनेनेही सामना या मुखपत्रातून या वादात उडी घेत फेसबुक आडून भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आला आहात. उद्योग व्यवसायातील किमान काही नितीनियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुमचा धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर याकडे कानाडोळा करता येणार नाही, अशा शब्दात सामनातून फेसबुकवर निशाणा साधण्यात आला आहे.

तसेच भारतातील लोकसंख्या हाच फेसबुकचा मोठा बाजार आहे, हे सांगताना फेसबुकच्या व्यावसायिक धोरणावरही टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काही द्वेष पसरविणारा मजकूर टाकला व त्यावर कारवाई करू नये म्हणून फेसबुकवर दबाव आणला, हे फेसबुक कंपनीनंही मान्य केलं असल्याचं सामनातून सांगण्यात आलं आहे.

तसेच सोशल मीडियावर बदनामी करणं हा पगारी व्यवसाय झाला असून कालपर्यंत मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे याच माध्यमाचा वापर करून मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली अडवतात तेव्हा वाईट वाटत, अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं सामनातून केली आहे.

तसेच भारतातील लोकसंख्या हाच फेसबुकचा मोठा बाजार आहे, हे सांगताना फेसबुकच्या व्यावसायिक धोरणावरही टीका केली आहे. भाजपच्या नेत्यांनी काही द्वेष पसरविणारा मजकूर टाकला व त्यावर कारवाई करू नये म्हणून फेसबुकवर दबाव आणला, हे फेसबुक कंपनीनंही मान्य केलं असल्याचं सामनातून सांगण्यात आलं आहे.तसेच सोशल मीडियावर बदनामी करणं हा पगारी व्यवसाय झाला असून कालपर्यंत मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे याच माध्यमाचा वापर करून मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली अडवतात तेव्हा वाईट वाटत, अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं सामनातून केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधी पक्ष नेताच उरणार नाही !

News Desk

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार! – मुख्यमंत्री

Aprna