HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द

बारामती | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजचा (१६ ऑगस्ट) बारामती दौरा रद्द झाला आहे. खरंतर, शरद पवार हे थोड्याच वेळापूर्वी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, पुण्याहून ते पुन्हा मुंबईत माघारी येण्यासाठी निघाल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज बारामती दौऱ्या होता. याच दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांची बारामतीत भेट होणार असल्याची माहिती मिळत होती. शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारल्यानंतर राष्ट्रवादीसोबतच पवार कुटुंबात देखील तणावाचे वातावरण होते. त्याचप्रमाणे, अजित पवार पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार आणि अजित पवारांची भेट होऊन त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र, आता शरद पवारांचा बारामती दौराच रद्द झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे काल रात्रीच बारामतीत दाखल झाले आहेत. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये काल रात्रीच चर्चा झाली आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या यांच्या बारामतीतील घरी ही चर्चा झाली. मात्र, यावेळी शरद पवार उपस्थित नव्हते. आज अजित पवारांचा बारामती दौरा होता. तर शरद पवार मुंबईहून बारामतीला रवाना देखील झाले होते. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आज पार्थ पवारांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र, अचानक शरद पवारांचा बारामती दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, अर्थातच आता अजित पवार आणि शरद पवार यांची बारामतीत भेटही रद्द झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Aprna

शेतक-यांनी तूर खरेदीबाबत कोणतीही चिंता करु नये | सुभाष देशमुख

News Desk