HW News Marathi
राजकारण

विरोधक-सत्ताधारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आमने-सामने

मुंबई | मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. आज (१३ नोव्हेंबर)ला सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.

मराठा समाजाचे गेले बारा दिवस आझाद मैदानात आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. अद्याप सरकारने मराठा समाजाची दखल देखील घेतलेली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आणि उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ आणि योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन सुभाष देशमुख यांनी यावेळी दिले. याचबरोबर, मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला त्यांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी सरकारी योजनांअभावी होरपळत आहेत. म्हणूनच शेती साहित्य आणि गुराढोरांसह १५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईत धडक देणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार

Aprna

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

News Desk

राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या रश्मी बागल-कोलते उद्या घड्याळ सोडून हातावर बांधणार शिवबंधन

News Desk