HW News Marathi
राजकारण

शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवारांबद्दल केले मोठे विधान

नागपूर | गेले काही दिवस पवार कुटुंबात गोष्टी आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांना कवडीची किंमत नाही असे म्हटल्यानंतर अनेक प्रतिक्रिया यायला लागल्या आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तसेच पवार कुटुंबामधील अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. तसेच पार्थ पवार हा विषयही पक्षासाठी काही मोठा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच जय श्रीराम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. तसेच पार्थ पवार हे अपरिपक्व असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे पवार कुटुंबात तर कलह झालाच पण राजकारणात चर्चेचा नवा विषय देखील आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

पंतप्रधान मोदींच्या मंचावर विजयसिंह मोहिते पाटील, पवारांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा

News Desk

दिल्लीत ‘आप’ची सर्व मते काँग्रेसला गेल्याचा केजरीवालांचा दावा

News Desk