HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या अंगावर टाकला काळा कपडा

 

सुरत | गुजरात मध्ये रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घुसून रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या अंगावर एका तरुणाने काळा कपडा टाकला. भर पत्रकार परिषदेत हा प्रकार घडल्यामुळे रामदास आठवले काही वेळासाठी पुरते गोंधळलेले पहायला मिळाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

२ एप्रिल रोजी झालेल्या भारत बंद नंतर भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील दलित कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच हा बंद दडपण्यासाठी प्रयत्न करण्यात आले यामुळे भाजप मधील दलित खासदार मोदी सरकार विरोधात आवाज उठवू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांना रविवारी गुजरातमध्ये दलितांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

रामदास आठवले हे एनडीए सरकार मध्ये केंद्रीय मंत्री आहेत. सध्या दलित समाजातील लोकांवर आत्याचार होत असताना एकेकाळी पॅंथर असलेल्या आठवलेंकडून या प्रकारावर तीव्र अशी कोणतीही प्रतिक्रीया न आल्यामुळे दलित जनता नाराज असल्याचे पहायला मिळत आहे.

या प्रकारात नंतर तीन जणांना अटक

आठलेंच्या अंगावर काळा कपडा टाकल्याच्या घटनेनंतर संबंधित तीघांना सुरत पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कुणाल सोनवणे, मनोज पायदे आणि दिपक साठवे अशी या तिघांची नावे असून सोनवणे याने काळा कपडा टाकला तर पायदे आणि साठवे हे यावेळी त्याच्या सोबत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही हातात बंदुका घेऊन दारूच्या नशेत भाजप आमदाराचा नाच

News Desk

वडेट्टीवार खाजगीत मराठा समाजाला ओबीसीत घेण्याचा सल्ला देतात अन् ! संभाजीराजेंची टीका

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढणे अशक्य

News Desk