HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

गोवा काँग्रेसच्या १० आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, दिल्लीत घेणार शहांची भेट

गोवा | गोव्यात काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी बुधवारी (१० जुलै) रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसच्या एकूण १० आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. बुधवारी संध्याकाळी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पणजी येथे एक बैठक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पक्षाचा राजीनामा देत स्वतंत्र गट तयार करत भाजपमध्ये प्रवेश करावा असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर कवळेकर यांनी आपल्या १० आमदारांसह पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. तसेच हे सर्व आमदार आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळणकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस या १० जणांनी काँग्रेसला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे ५ जण काँग्रेसमध्ये राहिले आहेत. दरम्यान, बाबू कवळेकर यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्याचे देखील आश्वासन भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk

राष्ट्रपती निवडीनंतर राज्यात शिवसेनेला सत्तेतून डिच्चू ?

News Desk

राज्यपालांच्या भाषणादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मोठा गदारोळ

News Desk