Site icon HW News Marathi

शिंदे-फडणवीस सरकारच्या 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

मुंबई | शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री आज (9 ऑगस्ट) शपथ घेतली आहे.  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज (9 ऑगस्ट) मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची सोहळा पार पडला. या सर्व मंत्र्यांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.या शपथ विधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती सोहला पार पडला शिंदे गटाचे 9 जण तर भाजपचे 9 जण, असे एकूण 18 आमदार मंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज शपथ घेतलेल्यापैकी नक्की कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शनिवारी-रविवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळावर चर्चा झाली. यानंतर आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 38 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळचा विस्तार रखडल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सतत दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी शिंदे- फडणवीसांना टोला लगावला.

भाजपमधून ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात मिळाली संधी  

  1. राधाकृष्ण विखे पाटील
  2. सुधीर मुनगंटीवार
  3. गिरीश महाजन
  4. चंद्रकांत पाटील
  5. विजयकुमार गावित
  6. सुरेश खाडे
  7. रविंद्र चव्हाण
  8. अतुल सावे
  9. मंगलप्रभात लोढा

 

शिंदे गटातील ‘या’ आमदारांना मंत्रिमंडळात मिळाली संधी

  1. गुलाबराव पाटील
  2. संजय राठोड
  3. तानाजी सावंत
  4. संदीपान भुमरे
  5. उदय सामंत
  6. दादा भुसे
  7. दीपक केसरकर
  8. शंभुराजे देसाई
  9. अब्दुल सत्तार

 

संबंधित बातम्या

Maharashtra Cabinet Expansion Live Updates : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; मंत्री पदाची शपथ घेण्यास सुरुवात

Exit mobile version