HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग महामंडळांच्या कर्ज वितरणासाठी ३१५ कोटींची शासनहमी

मुंबई | सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळास १२५ कोटी , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास ७० कोटी; महाराष्ट्र्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास ७० कोटी तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी याप्रमाणे समाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रयत्नामुळे एकूण ३१५ कोटींची शासनहमी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळा चे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली आहे. याप्रकरणी राजाभाऊ सरवदे यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर स्वतः पाठपुरावा केला होता.

राज्यातील मागसावसर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगासाठी कर्जाद्वारे अर्थपुरवठा करण्यात महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाप्रमाणेच अन्य महामंडळांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मागासवर्गीय विकास महामंडळांद्वारे कर्जपुरवठा बंद करण्यात आला होता. त्याबाबत च्या तक्रारी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे अल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याबाबत रामदास आठवलेंनी संबंधित विभागाच्या बैठकी घेतल्यानंतर स्पष्ट झाले की सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना बेरोजगारांना पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र्र शासनाने त्या कर्जाची शासनहमी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान ३१५ कोटींच्या निधीची तरतूद करणे आवश्यक होते.

याबाबत रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांना कर्जवाटपासाठी आवश्यक असणारी शासनहमी राज्यसरकार घ्यावी अशी मागणी केली. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून मागासवर्गीय तरुणांच्या प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात! – राधाकृष्ण विखे-पाटील

Aprna

अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार गुजरातला

News Desk