Site icon HW News Marathi

“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही…”, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर तरी बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही,” असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गुलाबराव पाटील यांनी जगळगावमध्ये काल (28 ऑगस्ट) एका कार्यक्रमात जाहीर भाषणार वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

 

गुलाबराव पाटील म्हणाले, “1 हजार लोकांची ओपीडी होती. 8 ते 10 दोन तासात काढतो. आमच्यापेक्षा डॉक्टर तरी बरे. जनरल फिजीशियन, आर्थोपेडिक, हृयदरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही. आणि हातपाय बघणार कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही. पण, आम्ही तर जनरल फिजिशियन आहोत. आमच्याकडे बायको नांदत नाही तो पण माणूस येतो. आमचे एकटे डोके असते. डॉक्टरांचे एकाच फॅकल्टीचे डोके असते. पण, आमचे डोके असे असते की, इतके लोक जे बसलेत त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही त्यांना समज घालून त्यांचे काम करतो. आणि इतके गेल्यानंतर एक नवीन कोणी आले. तर इतके फ्रेश असतो की, पहिला तुच आलाय.”

 

गुलाबराव पाटील यांचे हेमा मालिनीसंदर्भात केलेले वादग्रस्त वक्तव्य

यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केली. पाटलांच्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यानंतर गुलाबराव पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारदरम्यान भाषण म्हणाले, “आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केले आहेत. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाही तर राजीनामा देईन.”

 

 

 

Exit mobile version