HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

नवी दिल्ली। महाराष्ट्रातील सत्तांतरावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (supreme court of india)  आज सुनावणी होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभेतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिकामी झाली आहे. या जागी पोटनिवडणूक होणार आहे. या जागी शिवसेनेकडून लटकेची पत्नी शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढवणार आहे. या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने लढविणार असल्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक चिन्हासाठी  काल (७ सप्टेंबर) न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात आज (८ सप्टेंबर) सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाने निवडणुकी चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरी सुनावणीला स्थगिती देऊ नका?, अशी याचिका न्यायालयात केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश उदय लळित यांनी तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले. यानुसार, याचिकेवर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले. तसेच या घटनापीठात उदय लळित यांचा सामील होणार नाही. आणि या घटनापीठासमोर आज सुनावणी होणार आहे.

शिंदे गटाने पक्षासोबत बंडखोरी केल्यापासून आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाने ‘धनुष्यबाण’वर सुद्धा आपल्या हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने कोणत्याही निर्णय देऊ नये, असा आदेश न्यायालयाने त्यांना दिला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनाही कागदपत्रे सादर करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर तत्कालीन विधानसभा उपाध्यांना नोटीस देण्यात आली होती. यानंतर शिंदे गटाने या नोटीसला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात चार याचिका दाखल केली आहे. अशा एकूण ५ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.

संबंधित बातम्या

Related posts

मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक संपली; बंडखोराबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Aprna

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Aprna

“मला पाठविलेली नोटीस जशी केली, तसे…”, चित्रा वाघांचे महिला आयोगाला आव्हान

Aprna