Site icon HW News Marathi

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; होणार थेट प्रक्षेपण

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होणार आहे. न्यायालयात आज (27 सप्टेंबर) होणारे कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तांतर हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. यावर सरन्यायाधीश उदय लळित यांनी काल (6 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

राज्यातील सत्तांतर, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची या पाच मुद्यांवर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने पक्षासोबत बंडखोरी केल्यापासून आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित आहेत. या या प्रकरणावर न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यात चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्तीं एम.आर. शहा, न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी, न्यायमूर्तीं हिमाकोहली आणि न्यायमूर्तीं पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सत्तांतरवर सुनावणी लांबणीवर जात आहे. या प्रकरणावर आज काय निर्णय येईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.

 

शिंदे गटाने पक्षासोबत बंडखोरी केल्यापासून आपली शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाने ‘धनुष्यबाण’वर सुद्धा आपल्या हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने कोणत्याही निर्णय देऊ नये, असा आदेश न्यायालयाने त्यांना असून निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनाही कागदपत्रे सादर करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यानुसार, दोन्ही गटाने कागदपत्रे सादर केली आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर तत्कालीन विधानसभा उपाध्यांना नोटीस देण्यात आली होती. यानंतर शिंदे गटाने या नोटीसला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात चार याचिका दाखल केली आहे. अशा एकूण ५ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे.
कोणत्या 5 याचिकेवर आज होणार सुनावणी
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका

महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

संबंधित बातम्या
महाराष्ट्रातील सत्तांतरावरील पुढील सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
Exit mobile version