HW Marathi
देश / विदेश राजकारण

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा

नवी दिल्ली | काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी आज (१५ मे) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती हातामध्ये तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊ लागली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणे भारतीय संस्कृतिचा अपमान असल्याचे देखील या व्यक्तीने म्हटले.

हाता तिरंगा घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे नाव नचिकेता वाल्हेकर असून तो हिम्मतनगरचा रहिवासी असल्याची माहिती एएनआयने  दिली आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना नचिकेता यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांचे नाव घेण्याची यांच्यामध्ये (काँग्रेस) हिंमत नाही. हे लोक फक्त मोदी-शाह, मोदी शाह करत बसले आहेत. मोदी-शाह यांनी देशासाठी खूप काही केले आहे.

 

Related posts

नेहरू, राजीव गांधींनंतर ‘तो’ करिश्मा नरेंद्र मोदींमध्ये !

News Desk

अखेर शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश

News Desk

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्याच्या पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पास मान्यता

News Desk