Site icon HW News Marathi

“काही तरी असल्याशिवाय कोणी व्यक्ती नॉट रिचेबल नसतो”, शुभांगी पाटील यांचे सूचक विधान

मुंबई | “काही तरी असल्याशिवाय कोणी व्यक्ती नॉट रिचेबल नसतो”, असे सूचक विधान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी केले आहे. उमेदवार अर्ज मागे घेण्याचा आज (16 जानेवारी)शेवटचा दिवस होता. शुभांगी पाटील या आज सकाळपासून नॉट रिचेबल येत होत्या. यामुळे राजकीय वर्तुळा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. तसेचउमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर  शुभांगी पाटील नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्या होत्या. यावर शुभांगी पाटील यांन पत्रकारांनी त्या नॉट रिचेबल आणि महाविकासआघाडीचा पाठिंबा आदी मुद्द्यांवर प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तरे दिली. परंतु, शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा मिळणार का? यासंदर्भात प्रश्न चिन्ह अजूनही कायम आहे.

 

तुम्हाला काय सहन करावे लागले, असा प्रश्न पत्रकारांनी शुभांगी पाटील यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “सहन करणे हे ते सगळे चालत असते. वेळ काय घेईल आणि काय वेळ आणेल शेवटी ते राजकारण आहे. आपण उमेदवारी करत आहोत. एवढे मात्र नक्की.” तसेच तुम्ही नॉट रिचेबल होण्याचे कारण काय होते, असा सवाल पत्रकारांनी शुभांगी पाटील यांना केल्यावर ते म्हणाले, “ते वेळ आल्यावर सांगेन. काही तरी असल्याशिवाय कोणी व्यक्ती नॉट रिचेबल नसतो, हे तुम्हाला ही माहिती आहे.”

 

सर्व संघटनाना लढण्यासाठी पाठबळ देतील

शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी बऱ्याच शिक्षक संघटनेशी चर्चा केली असून त्यांचा पाठिंबा मागितला आहे. आणि मला विश्वास आहे की सगळ्या शिक्षक संघटना मला पाठिंबा देतील. कारण मी या निवडणुकीत शिक्षक उमेदवार म्हणून आहे. मी गेल्या 10 वर्षात शिक्षकांचे अनेक प्रश्न विनावेतन असतील, पेन्शन असेल, पदभरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील अनेक हजारो प्रश्न सोडविलेले आहे. या माध्यमातून मी पुढे आलेले आहे. त्यासाठी सर्व संघटनांनी मला पाठबळ दिलेले आहे. आता माझा उमेदवारी अर्ज कायम झालेला आहे. आता लढण्यासाठी तेच पाठबळ देतील.”

 

मला ‘मविआ’वर पूर्ण विश्वास

मविआ तुम्हाल उमेदवार म्हणून जाहीर करेल, यावर शुभांगी पाटील म्हणाल्या, “मला पूर्ण विश्वास आहे. उद्धव ठाकरे आणि नाना पटोलो. उद्धव ठाकरे हे त्यांचीशी बोलतील. अजित दादा असतील आणि जयंत पाटील असतील. आणि सगळ्या पक्षश्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील एकमेव महिला उमेदवारावर ते विश्वास टाकतील.” तुम्ही कोण कोणाशी संपर्क साधलेला आहे, या प्रश्नावर शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी सगळ्याशी संवाद साधलेला आहे. मी उद्धव ठाकरेंकडे जाऊन आलेले आहे. मला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिलेले आहे.

 

 

 

Exit mobile version