Site icon HW News Marathi

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

मुंबई | काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींना काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्याचा ठराव संमत झाला आहे. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठकीत सर्वांनी हात उंचावून पाठिंबा दिला. परंतु, राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनविण्याच्या ठरावावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी हात उचलाल नाही. यामुळे चव्हाण राहुल गांधींच्या अध्यक्ष बनवण्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष पदी विराजमान व्हावे, म्हणून दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेही ठराव मंजूर केला. मुंबईत काल (19 सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडले. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर देखील उतरले होते. या पार्श्वभूमीवर थरुरांनी काल दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी थरुर परवानगी घेण्यासाठी भेटल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

 

 

Exit mobile version