Site icon HW News Marathi

“मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही”, पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला

मुंबई | “संघर्ष होतो. पण, त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल. तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माध्यमांशी दिला. शरद पवार हे आज (3 ऑक्टोबर) एका कार्यक्रमा निमित्ताने गणेशकला क्रिडामंच सभागृहातील आले होते. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या दसरा मेळाव्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “एका पक्षाचे दोन भाग झाले, आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा सुरू झाल्याच्यानंतर त्या स्पर्धेचे सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले. आता गंमत अशी आहे. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण, त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल. ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राज्यातील जे जबाबदार लोक आहेत. त्या लोकांनी हे वातावरण दुरूस्त करायला पाऊले टाकली पाहिजेत. मग ती पाऊले टाकायची जबाबदारी आमच्या लोकांसारखी सीनियर लोक असतील त्यांच्यावर असेल. त्या ही पेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील. परंतु, महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करू या,  त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल.”

 

Exit mobile version