HW News Marathi
राजकारण

Exclusive : ‘आप’ महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने जागा वाटप करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये आम आदमी पक्षाच्या आमदार आणि बड्या नेत्यांची काल (१८ जानेवारी) बैठक झाली होती. या बैठकीत ‘आप’ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि,गुजरात या राज्यात लोकसभा निवडणुका लढणार नाही. या राज्यात आमचे तितके समर्थक नसल्यामुळे आमच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेल्याचे आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती मेनन यांनी एच. डब्ल्यू मराठीसोबत बोलताना सांगितले.

तसेच दिल्ली, हरियणा, पंजाब आणि गोवा या चार राज्यात निवडणुका लढणार असल्याची माहिती देखील मेनन यांनी दिली आहे. या चारही राज्यात आम्ही संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचा विश्वास मेनन यांनी व्यक्त केला आहे. तसेच या निवणुकात भाजपला दोरदार ठक्कर देण्यासाठी सज्ज झालो आहोत.

भाजप विरोधी मतांमध्ये फुट पाडायची नाही

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसह उर्वरित देशातील राज्यांमध्ये भाजप विरोधी मतांमध्ये आम्हाला फुट पाडायची नाही. त्यामुळे आप दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गोवा या चार राज्यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. कारण या राज्यात आपच्या समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही या राज्यात लक्ष केंद्रित करण्याचे पक्षांकडून ठरविण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल

News Desk

सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांचा कर्नाटकात समावेश?, बोम्मईंचे मोठे वक्तव्य

Aprna

इंग्रजांना जाऊन ७२ वर्षे झाली, आता त्यांचे प्रोटोकॉल बंद करा !

News Desk