HW News Marathi
राजकारण

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बसपा अध्यक्ष मायावती या ३ नावांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. या तिन्ही नेत्यांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव असल्याने आपण ही नावे सुचविल्याचे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत.

जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर विरोधकांमधून हे ३ जण पंतप्रधान पदासाठी प्रमुख उमेदवार असतील, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. “पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मला असे वाटते कि यंदा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती हे पंतप्रधान पदासाठी चांगले पर्याय ठरतील”, असे शरद पवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.

“राहुल गांधी यांनी अनेकदा स्वतःच सांगितले आहे कि ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडू मुंबईत आले होते. आपण पंतप्रधान पदाबाबत कोणताही विचार करत नसून लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करणे इतकेच आपले लक्ष्य असल्याचे त्यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहात?” संजय राऊतांचा सवाल

Aprna

शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला धक्का नाही

Aprna

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk