HW News Marathi
राजकारण

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई | राजा शिवछत्रपती मालिकेतील राजे शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणारे अभिनेता अमोल कोल्हे यांनी आज (१ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर राजकीय वर्तुळात कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज कोल्हे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट दिले जाणार असल्याची माहित सूत्रांकडून मिळाली आहे. कोल्हे हे शिरूर मतदार मतदारसंघातून लोकसभेच्या तिकिटावर लढणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कोल्हेंनी पक्षात प्रवेश केला. कोल्हे यांच्याबरोबर भाजपचे बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ. हर्षल यशवंत पवार आणि वरपे यांनी देखील राष्ट्रवादीत आज जाहीर प्रवेश केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा

News Desk

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna

#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार ? 

News Desk