Site icon HW News Marathi

“ज्यांची लायकी नाही अशा राजकारणांच्या हाती…”, सुबोध भावेंनी राज्यपालांना चपराक लगावली

मुंबई | “आज आपण देश उभारण्याचे काम ज्यांची लायकी नाही, अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत, ” अशी टीका अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी नाव घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली आहे. यावेळी भावेंनी तरुण पिढीला प्रेरित करताता म्हणाले, “आगरकर आणि टिळक यांच्या सहकार्यांनी शाळा-कॉलेजमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची व्यवस्था कशी असली पाहिजे. देशात काय आणि कसे असले पाहिजे,” याबाबत विचार करत असतील, यांची आठवण करत राजकारणांवर बोचरी टीका केली. पुण्यात  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुबोध भावेंना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले होते.

सुबोध भावे म्हणाले, “आज आपण देश उभारण्याचे काम ज्यांची लायकी नाही, अशा राजकारणांच्या हाती देश सोपवून आपण मोकळे झालो आहोत. आणि आपण विचार काय करतोय की तू अमेरिका, यूरोपला चालास मग तू पुढचे शिक्षण, मग पगार, मग बाल वाडीला तिकडे जायाचे आहे. एक्सेंजला जायाचे की बेंगलोर, एलए की कँलिफोरनियाला जायाचे आहे. आपण आपल्या करिअरच्या पलिकडे खरोखर आपण देशाचा विचार करतो. आपण आसा विचार करतो की आपण जे नालायक राजकारणी आपण जे निवडून दिलेले आहेत. ते आपल्या देशाच्यी काळजी घ्याला. तिकडे त्यांनी काय करून ठेवले गेल्या काही वर्षात आणि आजूनही काय करत आहेत. हे आपल्या सगळ्याच्या समोर आहे.”

करिअर पलिकडे आपण विचार करत नाही, अशी चपराक भावेंनी तरुण पिढीला लगावली 

“या संस्थेत येवू बोलण्याचे कारण असे आहे की, संस्थेची सुरुवात झालेली आहे. राष्ट्रीय शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला मिळाले पाहिजे. आणि ते राष्ट्रीय शिक्षण मिळणार नसेल तर आपल्या देशाचा विचार करणार पिढीच जर आपण निर्माण करणार नसो. तर मग या शिक्षणाचा खरच काही उपयोग आहे का?, ब्रिटिशांना येथे शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली होती कारण त्यांना येथे नोकर निर्माण करायचे होते. मालक निर्माण करायचे नव्हते. आणि आजही आपण शिक्षणाच्या माध्यमातून नोकरच निर्माण करतोय. म्हणूनच काल येथे एक भाष्य झाले की येथून काही लोक जर बाहेर गेली तर महाराष्ट्र हे मुंबई आर्थिक साम्राज्य उरणार नाही, अशा प्रकारची भाषा वापरण्याचे धारिष्ठय इथला नेता दाखवितो. मग खरोखर आता विचार करण्याची गरज आहे,” असे भावे म्हणाले.

 

 

Exit mobile version