HW News Marathi
राजकारण

सनी देओल यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

नवी दिल्ली | अभिनेता सनी देओल यांचा आज (२३ एप्रिल) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. सनी देओल यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सनी देओल आणि शहा यांच्या भेटीने त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर चर्चा रंगल्या होत्या. आता आज सनी देओल भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप सनी देओल यांना पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

माझ्यावडिलांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना समर्थन आणि काम केले होते. त्यांच्याप्रमाणे मी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काम करून समर्थन करणार आहे. माझे काम बोलेल भाजपप्रवेशानंतर सनी देओलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.सुरक्षा मंत्री निर्मला सितारमन आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थिती सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सनी देओल यांचे भाजपसोबत जुने नाते आहे. त्याचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी भाजपमधून २००४ मध्ये त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून वेगळे केले होते. परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमा मालिनी यांच्यासाठी निवडणूक प्रचार करीत आहे. सनी देओल यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर धर्मेंद्र त्यांच्या चिरंजीवासाठी प्रचार करताना दिसणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“50 आमदारांची ताकद आहे तर तुम्ही गुवाहाटीमध्ये का बसलाय?”, राऊतांचा शिंदेंना सवाल

Aprna

राज्यपालांनी माफी मागितली नाही यांची खंत! – उदयनराजे भोसले

Aprna

हल्लाबोलच्या प्रतिसादानंतर राष्ट्रवादीची राज्यभर परिवर्तन यात्रा !

News Desk