HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

अखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे …

अहमदनगर |  अभिनेत्री दिपाली सय्यद हिने २ दिवसांपासून उपोषण केले होते,त्याला कारण होते जलसिंचनं योजना मार्गी लावण्याचे. अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील दुष्काळी अशा 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण काल सरकारच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले आहे . नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी दिपाली सय्यद यांचा मोबाईलवरून  संपर्क केला त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर सय्यद यांनी उपोषण थांबविले आहे.

दिपाली सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले होते. साकळाई उपसा जलसिंचन योजनेस मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. या उपोषणाला अभिनेत्री मानसी नाईकनेसुद्धा पाठिंबा दिला होता.  नगर व श्रीगोंदे तालुक्‍यातील 35 लाभधारक गावांतील ग्रामस्थांनीही त्यांच्या उपोषणाला पाठींबा दिला होता. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी काल  सकाळी उपोषणस्थळी येत सय्यद यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी सरकारतर्फे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी उपोषणासंदर्भात भ्रमणध्वनीवर चर्चा केली. ” सध्या राज्यात पूरपरिस्थिती आहे. पूर परिस्थितीनंतर साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल,’ असे आश्‍वासन महाजन यांनी दिले.

सरकारच्या आश्वासनानंतर अखेर दिपाली सय्यद आणि ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

Related posts

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk

दुकानातील चोरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

शिवरायांना खरी आदरांजली वाहायची असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा – विखे-पाटील

News Desk