HW News Marathi
राजकारण

वनगांच्या प्रचार रॅलीत अदित्य ठाकरे सहभागी

पालघर | दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पालघर मधून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपवर नाराज होऊन शिवसेनेत आलेल्या वनगा यांच्या प्रचारासाठी बुधवारी युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे पालघर मध्ये उपस्थित राहीले. यावेळी अदित्य ठाकरे यांनी वनगांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला.

यावेळी अदित्य यांच्या सोबत शिवसेनेचे पालघर लोकसभा उमेदवार श्रीनिवास वनगा, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, खासदार अरविंद सावंत, आमदार अमित घोडा यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि युवासैनिकांनी सहभाग घेतलेला पहायला मिळाला.

दिवंगत चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपने आमची दखल घेतली नाही असा आरोप भाजपवर करत वनगा कुटुंबीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांचा अवधी घेत श्रीनिवास वनगा यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे जाहीर केले. सध्या वनगांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस ‘बोगस माणूस’ तर शरद पवार ‘अविश्वासू’ !

News Desk

मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे !

News Desk

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित

News Desk