HW News Marathi
राजकारण

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून देशातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत मोदी सरकारला पुन्हा एकदा बहुमताने निवडून दिले आहे. “२०१४ साली जर मोदी लाट होती तर यंदा म्हणजेच २०१९ साली मोदी त्सुनामी होती”, अशा शब्दात मोदी सरकारच्या या ऐतिहासिक विजयाचे विश्लेषण केले जात आहे. दरम्यान, या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी (२४ मे) भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.

“भाजपला आज जो विजय मिळाला आहे तो लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळेच मिळाला आहे. त्यांनी अनेक दशके मेहनत करुन पक्षाची बांधणी केली. जनतेसमोर एक नवीन विचारधारा मांडली. मुरली मनोहर जोशी यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहेत. मुरली मनोहर जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यांनी कायमच पक्षाला भक्कम करण्यात मोठी भूमिका बजावली होता. ते माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी पत्र पाठविले; उद्या ‘मविआ’ सरकार येणार धोक्यात?

Aprna

“कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, नावे जाहीर करा,” एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

Aprna

#LokSabhaElections2019 : जाणून घ्या… राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी

News Desk