HW Marathi
मनोरंजन राजकारण

पर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. पर्रिकरांनी रविवारी (१७ मार्च) सायंकाळी घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने गोवाच नव्हे तर संपूर्ण देशभरासह बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी देखील पर्रिकरांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

महानायक अभिनेते अमिताभ बच्चन म्हटले की आहे, “गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सारखा सज्जन व्यक्ती निघून गेले. पर्रीकर हे अत्यंत मृदूभाषिक असे व्यक्ती होते. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही वेळ घालवलाची मला संधी मिळाली.”

अक्षय कुमारनेही ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केले आहे. “मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी ऐकूण मला खूप वाईट वाटले. मी त्यांना भेटलो हे माझे भाग्यवान समजतो. पर्रिकरांसारख्या उत्तम व्यक्तीमत्त्वाला मला जाणून घेण्यांची मला संधी मिळाली होती.”

Related posts

तेलंगणातील पहिली तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता

News Desk

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk