HW News Marathi
राजकारण

एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट देणार

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुंबईत पोहोचल्यानंतर दादार येथील शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. शिंदे गट उद्या (30 जून) मुंबईत विश्वासदर्शक ठरावासाठी दाखल होणार आहेत. विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावाला जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीरआनंद दिघे स्मृतीस्थळ भेट देऊन मानवंदना देणार असल्याची माहिती शिंदेंनी आज (29 जून) शिंदेंनी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद बोलताना सांगितले.

शिंदे म्हणाले, “आमच्याकडे 2/3 आमदारांचे संख्याबळ आहे. तर माझ्यासोबत असलेल्या आमदाारंना कोणतीही बळजबरी केली नाही. सर्व आमदार हे येथे मोकळ्या वातावरणात वावरत असून आम्ही सर्व जण हे शिवसेनेमध्येच आहोत. बहुमताचा अकडा हा आमच्याकडे असल्याचा दावा,” त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमत चाचाणीवर आज सायंकाळी 5 वाजता निर्णय आल्यानंतर शिंदे हे गुवाहाटीमधील रॅडिसन हॉटेल गोवा मार्गे मुंबईत दाखल होणार आहे. गुवाहाटीला दाखल झाल्यापासून शिंदे हे आज देवीच्या दर्शनासाठी बाहेर आले.

संबंधित बातम्या
“सर्व आमदार उद्या विश्वासदर्शक ठरावासाठी मुंबईत पोहोचणार,” एकनाथ शिंदेंची माहिती

 

Related posts

पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त | ममता बॅनर्जी

News Desk

आम्ही विराेधी पक्षात नव्हे तर सत्तेत असू !

News Desk

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

News Desk