Site icon HW News Marathi

विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविले आहे. या अधिवेशनाचा आज (३ जुलै) पहिला दिवस आहे. आजच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले सर्व आमदार हे काल (२ जुलै) गोव्याहून मुंबई दाखल झाले असून हे सर्व आमदार ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुक्कामी आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी निवड करण्यात आली आहे. तर  तिन्ही पक्षांची चर्चा केल्यानंतर महविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी निवडणूक केली. महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी राजन साळवी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी दिले. यामुळे विधानसभा अध्यक्ष पदी नक्की कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागले आहेत.
Exit mobile version