HW News Marathi
राजकारण

अखेर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; देवेंद्र फडणवीसांसोबत राज्यपालांची घेणार भेट

मुंबई | राज्यात गेल्या दहा दिवसांपासून राजकीय सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल (29 जून) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज (30 जून) गोव्यावरून मुंबईत दाखल झाले आहे. शिंदे विमानतळावर दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले आहे. आणि यानंतर शिंदे आणि फडणवीस दोघेही राजभवनात जाऊन राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांनी राज्यापालांची भेटनंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यात वर्तवली जात आहे. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, शिंदे हे विधान परिषदेच्या निकाल लागल्यानंतर म्हणजे 20 जून रोजी मध्य रात्रीपासून गायब होते. शिंदेसह शिवसेनेचे आमदार देखील गायब होते. यानंतर उद्या (21 जून) दिवशी मसजले की शिंदेसह 40 आमदार गुजरातमधील सुरतमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होती. यानंतर शिंदे गट हा गुवाहाटीला आपला मुक्काम हलविला. यानंतर गेल्या आठवड्या भरापासून शिंदे हे गुवाहाटीमध्ये मुक्कामी होते.  शिंदे गटांनी काल (29 जून) साध्याकाळी रॅडिसन हॉटेल मुक्काम हलवून गोव्यात दाखल झाले होते. यानंतर उद्धव ठाकरे हे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तर दुसऱ्या बाजुला भाजपच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना कमलाचा वेग आला आहे.

उद्धव ठाकरे हे आमचेच नेते –  दीपक केसरकर

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्हला आनंद नाही झाला. आुम्ही सर्व 50 आमदारांनी केवळ हिंदुत्व आणि आमच्या मतदारसंघातील कामांसाठी ही भूमिका घेली आहे. आणि उद्धव ठाकरे हे आमचेच नेते आहे, असेही शिंदे गटाचे प्रवक्ता आणि गटनेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.”

संबंधित बातम्या
मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करतोय! – उद्धव ठाकरे

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमारस्वामी ‘अ‍ॅक्सिडेंटल सीएम’, भाजपचा टोला

News Desk

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

Aprna

फक्त ५९ मिनिटांमध्ये मिळणार कर्ज, पंतप्रधान मोदींची घोषणा

Gauri Tilekar