Site icon HW News Marathi

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह कुणाचे यावर निवडणूक आयोगात होणार फैसला

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. यानंतर शिंदेंनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदेंनी बंड केल्यापासून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. या प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आज (7 ऑक्टोबर) लढाई होणार असून  शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडायची आहे. ठाकरे गट आज दुपारी 1 वाजता आपले प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करेल.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खादार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झालेली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे. या पोटनिवडणुकीची अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरू झाली असून 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. यामुळे धनुष्यबाण या चिन्हाचे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत कोणतीही बाजू मांडलेली नाही. ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदा बाजू मांडणार आहे. यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे महत्वाचे आहे. धनुष्यबाणाचे निर्णय आपण बोलतो म्हणजे शिंदे गटाचे बंडनंतर धनुष्यबाण कोणाला मिळाला पाहिजे. आयोगाला कधी कधी अशा प्रकारच्या वादामध्ये असे निर्णय ही घ्यावे लागलात. निवडणूक जवळ आलेली असेल तर चिन्हाचे काय करायचे या हा निर्णय तातपुरर्ता घ्यावा लागणार आहे. निवडणूक आयोगात फक्त कागदपत्रे सादर करणार असून आज कोणतीही सुनावणी नाही. तर दोन तीन दिवसात निवडणूक आयोगात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे-शिंदे गट कोणते चिन्हे घेणार

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचारविनिमय सुरू आहे. नुकतेच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी व्यासपीठावर एक तलवार आणण्यात आली होती. यामुळे शिंदे गट तलवारीचे चिन्ह घेणार असून ठाकरे गटाकडून ढाल आणि तलवार चिन्ह घेण्यावर विचार सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

 

 

Exit mobile version