HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

एमआयएम राज्यात १०० जागा लढवण्यासाठी इच्छुक

मुंबई | येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर एमआयएम राज्यात १०० जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याकडे एमआयएमने आपल्या १०० जागांची यादी देखील सोपवली आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय देखील जाहीर होईल. मुस्लिम आणि दलित मतांचे मताधिक्य विजयापर्यंत पोहचवू शकतं. अशा जागा एमआयएम लढवणार असल्याचे सांगितलं आहे. महाराष्ट्रातील 100 जागांची एक यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष ‘वंचित बहुजन आघाडी’ला आपल्यासोबत घेण्यास तयार असूनही ‘वंचित’ या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. “दिशाहीन काँग्रेससोबत न जाता आम्ही आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू”, असे प्रकाश आंबेडकर यांनी काहीच दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. “राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन एक महिना झाला तरीही काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाबाबत वाटाघाटी करायची झाली तर ती कुणासोबत करणार ?” असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Related posts

कुमार आयलानींचा ओमी कलानीला विरोध का?

News Desk

केजरीवालांवर ६ कोटींना लोकसभेचे तिकीट विकल्याचा गंभीर आरोप

News Desk

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत !

News Desk