HW News Marathi
राजकारण

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

नवी दिल्ली | “राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्या”, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गांधी कुटुंबियांवर टीका केली आहे. “काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित आहे”, असेही ते यावेळी म्हणाले. गुजरातमधील गोध्रा येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

“राहुल गांधींचे लग्न झाले नाही. म्हणूनच आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत. भाजपमध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो. परंतु काँग्रेसमधील एखादा सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का ?”, असे अमित शाह यावेळी म्हणाले. “मी भाजपचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे”, असेही ते यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, ६३०० कोटींचे कंत्राट रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

News Desk

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

News Desk

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

swarit