HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

गणेश विसर्जनाची ही पद्धत कोणती?, नवनीत राणा झाल्या ट्रोल

मुंबई | नुकतंच गणेशोत्सव पार पडला. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायला निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांनी सुद्धा मोठ्या थाटामाटात गणेश विसर्जन केलं. तर यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मात्र यावेळेस निमित गणपती विसर्जनाचं ठरलं आहे. नवनीत आणि त्यांचे पती व खासदार रवी राणा गणेश विसर्जन करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यावरून नवनीत राणांना ट्रोल केलं जात आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अनादर केल्याबद्दल नेटिझन्स आणि राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. नवनीत राणा व रवी राणा यांनी गणेशमूर्ती थेट वरून फेकली असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर ज्या पाण्यात त्यांनी मूर्ती टाकली ते पाणी देखील अस्वच्छ व गढूळ होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडिया युजर्सनी राणा दाम्पत्यावर टीका करत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राणा दाम्पत्य खूप ट्रोल होत आहेत. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. काहींनी कमेंटमध्ये लिहिलं आहे की “गणपती विसर्जनाची ही कोणती पद्धत?”, “हेच का तुमचं हिंदुत्व?”.  त्याचबरोबर अनेकांनी हिंदू देवता आणि धर्माचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतरांनीही असेच केले असते तर राणा दाम्पत्य आणि भाजपने हा मुद्दा बनवला असता, असेही काहींनी म्हंटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत, मुश्रीफांचा टोला

News Desk

आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही | मोदी

News Desk

बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे! – सामना 

News Desk